पोईचा येथील नीलकंठधाम स्वामीनारायण मंदिर

poicha
गुजताथेत अनेक सुंदर सुंदर मंदिरे आहेत. बडोद्यापासून ६० किमीवर बांधले गेलेले पोईचा येथील नीलकंठधाम स्वामी मंदिर केवळ भाविकातच नाही तर पर्यटकांतहि खूपच लोकप्रिय ठरले आहे. नर्मदा नदीच्या काठी १०५ एकराच्या विशाल परिसरात हे मंदिर स्वामी नारायण गुरुकुल राजकोट यांनी उभारले आहे.

या मंदिरात महादेवाची नटराज स्वरूपातील भव्य मूर्ती असून मंदिराचा परिसर अत्यंत आकर्षक आहे. मंदिर इमारती भोवती सरोवर असून गणेश, हनुमान, शिवलिंग स्थापन केलेली मंदिरे आहेत तसेच इतर अनेक छोटी मंदिरेही आहेत. महालाचा आभास होईल याप्रमाणे हे मंदिर बांधले गेले आहे. रात्री या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.

nilkanth
जवळच भाविकांना नर्मदा स्नान करण्याची सुविधा दिली गेली असून सुसज्ज फूड कोर्ट भाविकांची तृष्ण आणि भूक भागविण्यासाठी सज्ज आहे. येथे अगोदर बुकिंग करून खोली बुक करता येते. देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक येथे येत असतात.

Leave a Comment