१० अब्ज डॉलर्स गुंतवून जामनगर रिफायनरीचा विस्तार करणार अंबानी

jamnagar
मुकेश अंबानी यांची रिलायंस इंडस्ट्री त्यांच्या जामनगर येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा (रिफायनरी) चा विस्तार करणार असून त्यासाठी १० अब्ज डॉलर्सची गुंतवून केली जाणार असल्याचे समजते. मिडिया रिपोर्ट नुसार या विस्तारामुळे जामनगर रिफायनरी जगातील सर्वात मोठी रिफायनरी बनेल. या रिफायनरीत ३० दशलक्ष टन कच्चे तेल प्रोसेस केले जाईल.

आंतरराष्ट्रीय उर्जा एजन्सीने वर्तविलेल्या अंदाजानुसार २०४० पर्यंत भारतात उर्जा मागणीत दुप्पट वाढ अपेक्षित आहे. रिलायंसने सौदी अमरको व एएनएओसी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रस्तावित या प्रकल्पासाठी ६० दशलक्ष टन क्षमतेच्या रिफायनरी संकुलात गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. रोसनेफ्ट आणि आयइए नुसार भारत आणि मध्यपूर्वेत इंधन मागणी युरोपीय संघाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे जामनगर रिफायनरी विस्ताराचे काम २०२० पर्यंत सुरु करण्यासाठी रिलायंस प्रयत्नशील आहे.

Leave a Comment