महाराष्ट्राच्या या शहरांमध्ये मिळणार रिलायन्स जिओची फ्री सेवा

reliance-jio
मुंबई : टेलिकॉम क्षेत्रानंतर रिलायंस जिओ आता जिओ गीगाफाइबर FTTH ब्रॉडबँड सर्विस सुरु करत आहे. यासंदर्भातील एका मीडिया रिपोर्टनुसार जिओ कंपनीने त्या शहरांमध्ये सर्वात आधी ही सेवा सुरु करणार आहे ज्या शहरातून सर्वाधिक अर्ज येतील. जर तुम्हाला जिओची ही सेवा हवी असेल तर तुम्हाला Jio.com वर अर्ज करावा लागेल.

रिपोर्टनुसार कंपनी सुरुवातीला ३ महिने सर्व ग्राहकांना मोफत सेवा देणार आहे. १०० जीबी डेटा ज्यामध्ये फ्री मिळणार आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. बंगळुरु, चेन्‍नई, रांची, पुणे, इंदौर, ठाणे, भोपाळ, लखनऊ, कानपूर, पटना, इलाहाबाद, रायपूर, नागपूर, गाजियाबाद, लुधियाना, मदुरै, नाशिक, फरीदाबाद, कोयंबतूर, गुवाहाटी, आग्रा, मेरठ, राजकोट, श्रीनगर, अमृतसर, चंडीगढ, जोधपूर, कोटा आणि सोलापूर या शहरांमध्ये सेवा सुरु होणार आहे.

याबाबत टाइम्‍सनाऊच्या रिपोर्टनुसार अजून कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली तरी अशी शक्यता आहे की, जिओ गीगाफायबर प्लान ५०० रुपयांपासून सुरु होणार आहे. या प्‍लानमध्ये ५०Mbpsचा स्पीड मिळू शकतो. महिन्याला ज्यामध्ये ३०० जीबी डेटा मिळणार आहे.

Leave a Comment