आता रक्त तपासणी होण्यापूर्वीच कुत्रे करणार मलेरियाचे निदान

dog
मलेरिया किंवा तत्सम आजारांचे निदान होण्याकरिता रक्ताची तपासणी होणे गरजेचे असते. पण अनेकदा रक्त तपासणी करून देखील आजाराचे योग्य निदान होतेच असे नाही. अश्या प्रकारच्या आजारांचे निदान करण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याचे काम गेली अनेक शतके निरनिराळ्या वैद्यकीय संस्थांमध्ये सुरु आहे. रक्तामध्ये ( डीएनए मध्ये) उपस्थित असलेले त्या आजाराचे विशिष्ट ‘मार्कर्स’ केवळ वासाने ओळखण्याची अद्भुत क्षमता निसर्गाने कुत्र्यांना दिलेली आहे. तसेच शरीराला येणाऱ्या विशिष्ट गंधावरूनही काही आजारांचे निदान कुत्रे करू शकतात. याच क्षमतेचा वापर करून घेत आता मलेरियाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे ओळखण्याचे प्रशिक्षण कुत्र्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे रक्त तपासणीमधून निदान होण्यापूर्वीच केवळ मार्कर्सच्या किंवा शरीराला येणाऱ्या विशिष्ट गंधावरुन मलेरियाचे निदान हे प्रशिक्षित कुत्रे करू शकणार आहेत.
dog1
या संबंधी सुरु असलेल्या शोध कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, मलेरियाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कपड्यांचा वास घेऊन मलेरियाच्या रोगाचे निदान करण्याचे प्रशिक्षण कुत्र्यांना देण्यात येत आहे. हा उपक्रम ब्रिटनमधील डरहॅम विद्यापीठामध्ये सुरु असून, हा उपक्रम आजाराचे निदान करण्याच्या दृष्टीने मोठा सहायक ठरणार असल्याची खात्री वैद्यानिकांना आहे. या शोधाच्या नुसार मलेरियाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरातून एक विशिष्ट वास येतो. हा वास ओळखून मलेरियाचे निदान करण्याचे प्रशिक्षण कुत्र्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात येत आहे.
dog2
आफ्रिकेतील मलेरियाने संक्रमित मुलांच्या कपड्यांवरून रोगाचे यशस्वी निदान या प्रशिक्षित कुत्र्यांनी केले आहे. या संक्रमित मुलांनी पायांमध्ये घातलेले मोजे ब्रिटनला पाठविण्यात आल्या नंतर १७५ मोज्यांच्या जोड्यांपैकी ३० जोड्या मलेरियाच्या विशिष्ट वासाने संक्रमित असल्याचे निदान ‘मेडिकल डीटेक्शन डॉग्स’द्वारे करण्यात आले. या कुत्र्यांना कर्करोग आणि पार्किंसन्स सारख्या आजारांचे निदान करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

Leave a Comment