मुंबई : ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमीच तत्पर असते. नवीन योजनांचा लाभ ग्राहकांना घेता यावा यासाठी बँक सतत प्रयत्न करत असते. एसबीआय बँकेने हेच लक्षात घेऊन नेट बँकिंग सेवेमध्ये लाभदायी फिचरचा समावेश करण्यात आला आहे. एसबीआय बँकेकडून आनलाईन पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी या फिचरमुळे दिलासा देणारी बातमी आहे.
स्टेट बँकेने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम
दिवसा पैसे ट्रान्सफर करताना विशिष्ट रकमेपेक्षा जास्त रक्कम पाठवता येत नव्हती. परंतु आता या रकमेच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. तुम्ही पैसे पाठवत असलेले खाते एसबीआय बँकेचे असेल तर काही मिनिटात तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येतील पण जर इतर कणत्याही बँकेचे खाते असल्यास तुम्ही IMPS आणि NEFT चा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकता. एसबीआय बँकेतून आता २५ हजारपर्यंत रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे. त्याचबरोबर पैसे ट्रान्सफर करताना १०-१०आणि ५ हजारांच्या टप्प्यांमध्ये ट्रान्सफर करावे लागेल. अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ट्विटरवरून देण्यात आली आहे.