मॉडिफाय केल्यानंतर लॅम्बोर्गिनी सारखी दिसते मारुतीची बलेनो कार

maruti
मारुती सुझुकी बलेनोची कारमध्ये फेरबदल करणारी कंपनी ३६० मोटरिंग कोल्लमने फेररचना केली आहे. या कारचे स्वरूप फेरबदलानंतर अगदी लॅम्बोर्गिनी सारखेच दिसते. सिजर डोअर देखील या कारमध्ये लॅम्बोर्गिनी सारखेच लावले गेले आहे. या कंपनीचे केरळच्या कुट्टीवट्टम जिल्ह्यातील करुणगापल्ली येथे मोठे शोरूम देखील आहे. भारतात अल्टो गाडीनंतर बलेनो या गाडीलाच सर्वाधिक मागणी आहे.

बलेनो या गाडीला समोर नवीन ग्रिल्स आणि बम्पर लावण्यात आले आहेत. बम्पर खालील बाजूस एलईडी लाइट आणि काळे स्प्लिटर देखील लावले आहेत. १७ इंच मार्केट रिम्स लावले आहे.आणि कारचा ग्राउंड क्लिअरन्स देखील कमी करण्यात आला आहे. गाडीच्या वरील बाजूस ग्लॉस wrapping केलेले आहे. या गाडीमध्ये फेरबदल करण्यासाठी किती खर्च लागला याविषयी कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. कार इंजिन आणि इंधन टाकी क्षमतेमध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत.

मारुतीची ही कार नेक्सा कंपनीने डिझाइन केलेली आहे. जवळपास ही कंपनी मारुतीच्या सर्वच प्रिमियम कार डिझाइन करत असते.कंपनीने या कारला पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. पेट्रोल कार मध्ये ११९७सीसी तर, डिझेलमध्ये १२४८सीसी असे त्याचे इंजिन आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, पेट्रोल इंजिन २१.४ किमी प्रतिलिटर तर, डिझेल इंजिन २७. ३९ किमी प्रतिलिटर एवढे मायलेज देते. दोन्ही व्हेरिएंट मध्ये इंधन टाकी ३७ लिटरच आहे. तर इंजिन ४ सिलेंडरचे आहे.

या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये पायांसाठी आरामदायी अंतर ठेवण्यात आले आहे तसेच, आतील बाजूस लेदर फिनिशिंग देखील दिले आहे . या कारमध्ये ७ इंच इन्फोटेनमेंट प्रणाली आहे. ती ऍपलच्या ‘कार प्ले’ टेक्नॉलॉजीसह येते. कारमध्ये Adjustable स्टीयरिंग, ऑटो एसी, ऑटो ड्राइव्ह मोड, पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग, नवीन डिजिटल स्पीडो मीटर देखील मिळते. बलेनोला मॅन्युअल गिअर बॉक्ससह एम टी मॉडेलमध्ये देखील लॉन्च केले गेले आहे.

Leave a Comment