नाळच्या प्रीमियरलाही कडाडली नागराज अण्णाची ‘हलगी’!

nagraj-manjule
महाराष्ट्रभर नागराज मंजुळे यांच्या आटपाट बॅनरखाली बनलेला नाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला. राज्यात आणि इतर राज्यातही प्रेक्षकांना नाळ आवडल्याचे चित्र दिसत आहे. नागराजचा मातीतली गोष्ट मांडण्यावर भर असतो. त्याचा कॅमेरामन आणि नाळचा दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी नेमका हाच धागा पकडला असून धुमधडाक्यात नाळ चित्रपटाच्या प्रीमियरला सुरुवात झाली. आपण हलग्यांचा कडकडाट सैराटच्यावेळी अनुभवला होता. नाळच्या प्रीमियरलाही या पारंपरिक रणवाद्याचा वापर दिसून आला.

हलग्या वाजवून करमाळा तालुक्यातून आलेल्या नागराज समर्थकांनी आपला आनंद व्यक्त केला. नागराज मंजुळेंनाही यावेळी हालगी वाजवण्याचा मोह झाला आणि उपस्थितांच्या टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात हालगी कडाडली. ‘नाळ’हा चित्रपट एका लहान मुलाच्या भावविश्वाची ,आई मुलाच्या नात्याची छान गोष्ट आहे. लहान वयात छोट्या मुलांना खूप प्रश्न पडतात. या प्रश्नांच्या अवतीभवतीची ‘नाळ’ या चित्रपटाचा कथानक गुंफण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नागराज मंजूळे एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला आहे. नागराजचा हालगी वाजवत असलेला व्हिडिओ नागराजचा मित्र राम पवार यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

Leave a Comment