हुवावेचा नवा स्मार्टफोन रिअल टाईम सिनेमा फिचरसह

huvave
चीनी स्मार्टफोन कंपनी हुवावेने त्यांचा मेट सिरीज मधील नवा स्मार्टफोन एआय रिअल टाईम सिनेमा फिचर सह लाँच होत असल्याचे जाहीर केले आहे. या फोनमध्ये युजरला एआय कलर, बॅकग्राउंड ब्लर, सस्पेन्स व व्हिंटेज सारखी ऑप्शन मिळणार आहेत तसेच रेकोर्डिंग करताना ब्राईटनेस व सॅच्युरेशन अॅडजस्ट करता येणार आहे. यामुळे पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचा मुव्ही आस्पेक्ट रेशो मिळणार आहे. परिणामी अधिक देखणे आणि सुंदर फोटो काढणे शक्य होणार आहे.

गेल्या महिन्यात मेट सिरीज मधील मेट २० प्रो स्मार्टफोन चीन मध्ये लाँच करण्यात आला असून भारतात तो नोव्हेंबर मध्ये लाँच होणार आहे. अमेझॉनवर तो लिस्ट झाला आहे. या फोनला ६.३९ इंची एचदि ओलेड डिस्प्ले, ६/८ जीबी रॅम, ट्रिपल रिअर कॅमेरा, सेल्फी ३ डी फेशिअल रेकग्निशन २४ एमपीचा कॅमेरा आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल असे समजते.

Leave a Comment