महिंद्राने आणली इलेक्ट्रिक ट्रीओ ऑटो आणि यारी

treo
महिंद्राने भारतात ट्रीओ नावाने इलेक्ट्रिक ऑटो आणि यारी इ रिक्षा या नावाने तीनचाकी वाहन श्रेणीतील वाहने सादर केली असून या वाहनाची बंगलोर येथे एकस शो रूम किंमत अनुक्रमे २.२२ लाख आणि १.३६ लाख रुपये आहे.

ट्रीओ ऑटो मध्ये ड्रायव्हरसह ४ लोक बसू शकतात तर यारी मध्ये ड्रायव्हरसह पाच लोक बसू शकतात. या दोन्ही वाहनांना लिथियम आयर्न बॅटरी दिली गेली असून ऑटोची बॅटरी ३ तास ५० मिनिटात पूर्ण चार्ज होते आणि एका चार्ज मध्ये ती १३० किमी प्रवास करू शकते. ऑटोचा वेग तशी ४५ किमी आहे.

यारीची बॅटरी फुल चार्ज होण्यास अडीच तास लागतात आणि एका चार्ज मध्ये ती ८० किमी अंतर तोडते. तिचा वेग आहे ताशी २४.५ किमी. हि दोन्ही वाहने ५ वर्षासाठी झिरो मेंटेनन्स बॅटरी सह असून ऑटोला २ वर्षे किंवा ५० हजार किमी आणि यारीला १८ महिने किंवा ३० हजार किमी साठी वॉरंटी कंपनीने दिली आहे. हि दोन्ही वाहने बंगलोर आणि हैद्राबाद शहरात निवडक वितरकांकडे उपलब्ध केली गेली असून लवकरच देशाभरातील वितरकांकडे ती मिळू शकणार आहेत.

Leave a Comment