जगातील पहिल्या अंडरवॉटर हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी मोजावे लागतील ३६ लाख रुपये

underwater
आपल्या पाहुण्यांना समुद्राच्या आत झोपण्याची मजा देण्यासाठी मालदीवचे एक रिसॉर्ट सज्ज असून १०८ कोटी रुपये खर्च करून कोनार्ड मालदीव रंगाली आयलंडवर २ मजली रिसॉर्ट बनवण्यात आले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, इमारतीचा अर्धा भाग समुद्रावर आणि अर्धा भाग समुद्राखाली आहे. समुद्रात बांधलेले हे जगातील पहिलेच हॉटेल आणि बांधकाम मानले जात आहे. हॉटेलचे उर्वरीत काम याच महिन्यात सुद्धा पूर्ण झाले आहे. पण पर्यटकांना या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी तब्बल ३६ लाख रुपये मोजावे लागतील.
underwater1
आपल्या गेस्टला समुद्रातील जीवन दाखवणे हा मुराका नावाच्या या रिसॉर्टचा हेतू आहे. या बंगल्यात जिम, बार, पूल, क्वार्टर्ससाठी बटलर, समुद्राजवळ बाथटब आणि अंडरवॉटर बेडरुम सुद्धा आहे. किंग साइज बेड असलेल्या या बंगल्यातील बेडरुममध्ये बाथरुम सुद्धा आहेत. अंडरसी बंगल्याचा अर्धा भाग वरच्या भागाला जोडण्यासाठी स्पायरल पायऱ्या आहेत. हॉटेलचा वरचा भाग सी फेसिंग असून ५५० चौरस मीटर असा प्रशस्त आहेत. तर खालचा भाग १०२ चौरस मीटरमध्ये बांधण्यात आला आहे.
underwater2
एकाचवेळी ९ पर्यटक मुराका विलामध्ये थांबू शकतील अशी क्षमता आहे. अंडरवॉटर डिझाईन स्पेशलिस्ट एम जे मर्फी या खासगी संस्थेने डिझाईन केले आहे. या व्यतिरिक्त पेम्बा आइलंडवर मान्ता रिसॉर्टमध्ये सुद्धा एक रुम अंडरवॉटर आहे. पण, बंगलाच अंडरवॉटर असलेले हे जगातील पहिले ठिकाण मानले जात आहे.

Leave a Comment