अशी करा जावा बाईकची प्रीबुकींग

jawa
गुरूवारी भारतात बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित जावा मोटरसायकल लाँच करण्यात आली. या मोटरसायकलचे ‘जावा, जावा ४२ आणि जावा पेराक’ असे तीन नवे मॉडेल्स कंपनीने सादर केले आहेत. जावा ही अत्यंत प्रतिष्ठेची व भारतात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेली मोटरसायकल अखेर महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिच्या क्लासिक लीजंड्स या कंपनीच्या पुढाकाराने भारतात लाँच झाली आहे. जावा बाईकची प्रीबुकींग कंपनीने सुरू केली आहे.

तुम्हाला देखील ऑनलाइन जर बाईक बुक करायची असेल तर jawamotorcycles.com/booking वर बूक केली जात आहे. तर प्री-बुकिंगची कशी होते पाहा.

https://www.jawamotorcycles.com/booking वर जा

बुकिंगच्या अगोदर तुमचे नाव आणि मोबाईल नंबर लिहून रजिस्‍ट्रेशन करावा लागेल त्या वर क्लिक केल्यानंतर शहराचं नाव आणि संबंधित डिलरचा ऑप्‍शन मिळेल, त्याला सिलेक्ट करा.

येथे तुम्हाला मॅाडेलची निवड करावी लागेल, सोबत कलरच ऑप्‍शन विचारले जाईल. आवडता रंग निवडा

येथे आधार कार्डची माहिती मागितली जाईल, आधार अपलोड केल्यानंतर तुमचे नाव, पत्ता इत्यादी माहिती भरावी लागेल.

पुढील क्रिया नावावर क्लिक केल्यावर नवीन विंडो उघडेल

त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. मग बुकिंग झाल्याचे कन्फर्मेशन येईल.

Leave a Comment