आयफोन वापरू नका, मार्क झुकेरबर्गचे फेसबुक स्टाफला आदेश

markzu
सोशल नेट्वर्किंग साईट फेसबुकचा संस्थापक आणि अध्यक्ष मार्क झुकेरबर्ग याने कार्यालयातील कर्मचार्यांना अॅपल आयफोनचा वापर न करण्याचे आदेश दिले असून कार्यालयात स्टाफने अँड्राईड फोन वापरावेत असे सांगितले असल्याचे समजते. अॅपलचा सीईओ टीम कुक याने एका मुलाखतीत फेसबुकवर केलेल्या टीकेमुळे मार्क नाराज झाला आणि त्यामुळे असे आदेश दिले गेल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार कुकने एका मुलाखतीत त्याला केम्ब्रिज अॅनालाटिका संदर्भात विचारण्यात आलेल्या एक प्रश्नाला उत्तर देताना फेसबुकवर टीका केली होती. कुक म्हणाला, आम्ही कधीच कुणाच्या खासगी आयुष्यात घुसत नाही. खासगीपणा हा मानवाचा अधिकार आहे आणि सिव्हील स्वातंत्र्य आहे. फेसबुक युजरच्या डेटाचा वापर पैसे मिळविण्यासाठी करत आहे आणि अॅपल असले काम कधीच करणार नाही.

कुकच्या या विधानामुळे दोन्ही कंपन्यात तणाव निर्माण झाला असून यातूनच मार्क झुकेरबर्गने वरील आदेश दिल्याचे समजते.

Leave a Comment