गोंदिया जिल्यात रेल्वेखाली सापडून वाघाचे दोन बछडे ठार

tiger
महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्यात चंद फोर्ट जवळ वाघाचे दोन बछाडे रेल्वेखाली सापडून ठार झाले असल्याचे समजते. दोन्ही पिले सहा महिन्याची आहेत. गुरुवारी सकाळी रेल्वे अधिकार्यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी सूचना विभागाला कळविले त्यानंतर या मृत बछड्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांना रुळावरून हलविले गेले आहे.हि दोन्ही पिले वाघिणी आहेत.

वेगवान रेल्वेखाली हे बछडे रुळावर असताना चिरडले गेले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे बछाड्यांच्या आईचा आसपास वावर दिसला नाही. सर्वसाधारणपणे पिल्लू जखमी झाले अथवा मरण पावले तर वाघीण जवळच असते. १४ एप्रिल २०१३ रोजी याच रुळांवर अशीच वाघाची दोन पिले अपघातात सापडली होती. त्यातील एक मरण पावले होते तर दुसरे जखमी झाल्याने अपंग झाले होते. याच वर्षी गोन्दियाजवळ २३ जून रोजी एका बिबट्याचा रेल्वेला धडकल्याने मृत्यू झाला होता तर १३ जुलै २०१७ ला एक अस्वल आणि त्याच्या दोन पिलांना रेल्वेची धडक बसली होती.

Leave a Comment