नव्या अवतारात पुन्हा रस्त्यावर धावणार जावा ३०० मोटारसायकल

jawa
पुन्हा एकदा नव्या अवतारात पुन्हा रस्त्यावर धावताना ऐंशीच्या दशकातील तरुणाईची आवडती बाईक ‘जावा ३००’ दिसणार आहे. जावा कंपनीचे सर्वाधिकार महिंद्रा कंपनीने ताब्यात घेतले असून, ‘जावा ३००’ या बाईकचे १५ नोव्हेंबरला अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात येणार आहे.

आठ नोव्हेंबर हा सिलिकॉन सिटी पुण्यात जागतिक जावा बाईक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. बाईकच्या जुन्या भागांचे यानिमित्ताने एकत्रीकरण करून हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी एकूण २५० बाईक्सचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या बाईकने आजही तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना भूरळ घातलेली दिसून येते. जावा मोटारसायकल जुन्या लुकसह नव्याने बाजारात येत आहे. ही बाईक दीड लाख रुपयांपासून बाजारात उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment