सोशल मीडियासाठी नियमावली बनवणार ट्राय

social-media
नवी दिल्ली – मोबाईलऐवजी संवादासाठी अनेकजण फेसबुक, व्हॉट्सअॅपचा सारख्या समाजमाध्यमांचा वापर करतात. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) या सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी नियम लागू करणार असून ट्रायने त्याबाबत नागरिकांकडून मते मागविली आहेत.

विविध टेलिकॉम ऑपरेटरने अनेक दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा ओटीटी अप्लीकेशनला नियम लागू करावेत, अशी मागणी केली होती. फेसबुकसारख्या सोशल मीडियाकडे सरकारने खोट्या बातम्या आणि वैयक्तिक माहिती लिक होणे यामुळे मोर्चा वळविला आहे. टेलिकॉम ऑपरेटरप्रमाणे ओटीटी सेवांचे नियमन आणि आर्थिक बाबींचा विचार करण्याचे ट्रायने ठरविले आहे.

व्हॉट्सअॅप, स्काईप, व्हाबर, हाईक आणि काही प्रमाणात फेसबुक आणि ट्विटरच्या सेवेवर नव्या नियमामुळे परिणाम होणार असल्याचे सुत्राने सांगितले. यामध्ये व्हिडिओ साईट्चा मात्र समावेश नसल्याचे सुत्राने म्हटले आहे. सोशल मीडियासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मार्गदर्शक नियमावली आखणार आहे. ओटीटी सेवेमुळे कमी दरात व्हाईस कॉलिंग करता येत असल्याने मोबाईल कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. तसेच ओटीटीच्या वापरकर्त्यांची माहितीही सोशल मीडियाकडे पुरेशी नसल्याने सुरक्षेचा मुद्दाही ट्रायने उपस्थित केला आहे. त्यामुळे अफवा पसरविणे शक्य होत असल्याचे ट्रायने म्हटले आहे.

ट्रायने ओटीटी अप्लिकेशनवर (संवादासाठी इंटरनेटवर आधारित वापरण्यात येणारी अप्लीकेशन) टेलिकॉम ऑपरेटरसारखे नियम लागू करावेत, याबाबत जनतेमधून मत मागविले आहे. यावर स्काईप, व्हॉट्सअॅप आणि हाईककडून प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Leave a Comment