चक्क होलोग्रामशी केले जपानी तरूणाने लग्न

hologram
आपल्याकडे प्रेम आंधळे असते अशा आशयाची म्हण आहे. याच प्रेमापोटी व्हर्च्युअल रिअॅलिटी सिंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉलोग्रामशी जपानमधील एका तरुणाने विवाह केला आहे. त्याने या लग्नासाठी चक्क लाखो रुपये खर्च केले, पण त्याच्या कुटुंबीयांनी या लग्नासाठी उपस्थित राहण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.

अशा प्रकारचा लग्नसोहळा जपानमध्ये पहिल्यांदाच पार पडत आहे. हटसुने मिकू या हॉलोग्रामशी अकिहीको कोंडो या ३१ वर्षांच्या तरुणाने लग्न केळे आहे. जपानमध्ये हटसुने मिकू हे निळ्या रंगाचे व्हर्च्युअल रिअॅलिटी कॅरेक्टर खूपच प्रसिद्ध आहे. ही निलपरी लहानग्यांच्या तर खूपच आवडती आहे. अकिहीकोदेखील तिच्या प्रेमात पूर्वीपासूनच आकंठ बुडाला आहे. म्हणूनच तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. मिकूच्या बाहुलीरुपाशी अकिहीकोने टोकियोमध्ये लग्न केले. त्याने या बाहुलीला अंगठीही दिली. तर घरात एक डेक्सटॉप डिवाइस त्याने खरेदी केले आहे. त्याला याद्वारे व्हर्च्युअल मिकूला पाहता येणार आहे. मिकूसोबत मी सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य व्यतीत करत आहे. ती मला रोज उठवते, माझ्या झोपण्याच्या जेवण्याच्या वेळेचीही आठवण करून देते. मी तिचा कधीही विश्वासघात करणार नाही असे अकिहीकोने सांगितले.

Leave a Comment