आता व्हॉट्सअॅपवर कळणार ट्रेन कुठवर पोहोचली ते

whatsapp
रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येते आहे. घरातून तुम्ही बाहेर निघाल्यावर रेल्वेची माहिती पावला पावलावर मिळणे आता सोपे होणार आहे. यासाठी रेल्वे आणि खासगी कंपन्यांकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत.

रेल्वेबाबत माहिती M-indicator सारखे अॅप किंवा रेल्वेच्या वेबसाईटवर मिळते. पण समाधानकारक अशी ती माहिती नाही. घरातून बाहेर निघाल्यावर ट्रेन चालू आहेत की नाही, ट्रेन किती मिनिट उशिराने आहेत याबाबत सविस्तर माहिती मात्र अजूनही हातातल्या मोबाईलवर रिअल टाईममध्ये मिळेलच याची खात्री नाही. म्हणूनच आता रेल्वेने एक नवीन पर्याय निवडला आहे.

जर अँड्रॉईड फोन तुम्ही वापरत असाल तर ट्रेनबाबत माहिती मिळवणे आता अधिक सोपे होणार आहे. कारण आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्ही ट्रेनचे अपडेट घेऊ शकणार आहात. तुम्हाला यामध्ये एक नंबर देण्यात येईल त्या नंबरच्या साहाय्याने तुम्ही ट्रेनचे लोकेशन मिळवू शकणार आहात. त्याचबरोबर किती वेळात ट्रेन कुठे पोहचणार आहे याचीही माहिती मिळवू शकता.

मेक माय ट्रिप या ऑनलाईन कंपनीबरोबर रेल्वेने करार केला असल्यामुळे तुमच्या ट्रेनची सध्याची स्थिती तुम्हाला कळेल. कोणत्या स्टेशनवर तुम्ही आहात, ट्रेन किती वेळात येईल, किती वेळ थांबेल, कुठे थांबेल अशा सगळ्या प्रकारची माहिती या नंबरवर मिळेल.

तुम्ही पहिल्यांदा 7349389104 हा क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅप चालू करून तुमचे काँटॅक्ट रिफ्रेश करा. तुम्हाला यानंतर सेव्ह केलेला क्रमांक व्हॉट्सअॅपवर दिसेल. त्यावर क्लिक करून Start असा मेसेज पाठवा. यानंतर तुम्हाला रेल्वेच्या सर्व अपडेट्स या अॅपवर कळतील.

Leave a Comment