धुळे – राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज केली असून त्यांनी याबाबत राज्यातील सर्व आमदारांना पत्र देखील लिहले आहे. आमदार गोटेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजकारणातून आमदार अनिल गोटे यांचा संन्यास
भाजपने मागील काही दिवसात आपल्या पक्षात अनेक गुन्हेगारांना प्रवेश दिल्यामुळे मी नाराज असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी सांगितले आहे. भाजप काँग्रेस पक्षासारखेच गुन्हेगारांना अभय देत असल्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देत असून राजकीय संन्यास घेत असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले आहे. आमदार अनिल गोटे येत्या १९ नोव्हेंबरला आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.