गुगलने बालदिनानिमित्त साकारले खास डूडल

google
नवी दिल्ली – लहान मुलांवर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे भरपूर प्रेम होते. यामुळे १४ नोव्हेंबर नेहरूंच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. गुगलने बालदिनानिमित्त अनोखे डूडल तयार करुन शुभेच्छा दिल्या आहे. लहान मुलांची संशोधनात्मक वृत्ती या डूडलमधून दर्शवण्यात आली आहे.

एक छोटी मुलगी टेलिस्कोपच्या मदतीने अंतराळातील ग्रह-तारे, आकाशगंगा, सप्तर्षी साकारण्यात आलेल्या डुडल मध्ये बघत आहे. शिवाय एक अवकाश यान यामध्ये दाखवण्यात आले आहे. गुगलने याच माध्यमातून नेहरूंना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली दिली आहे.

Leave a Comment