मनमाड : नाशिकमधील लासलगावसह इतर बाजार समित्या दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे ११ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्यामुळे तब्बल आठवडाभर कांदा आणि धान्याचे लिलाव बंद राहतील. लिलाव १२ नोव्हेंबरला पुन्हा सुरु होणार आहे.
नऊ दिवस बंद राहणार लासलगावसह इतर बाजार समितीतील लिलाव
आजपासून लासलगाव ही मुख्य बाजारसमिती तर काही बाजार समित्या सोमवारपासून बंद राहणार असल्यामुळे आज-उद्याची साप्ताहिक सुट्टी, दिवाळीची पाच दिवस सुट्टी आणि पुढील आठवड्यात शनिवार-रविवार ही साप्ताहिक सुट्टी असे एकूण नऊ दिवस लिलाव बंद राहतील.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र काही दिवसातच कांद्याच्या दरात घसरण होऊन कांदा सरासरी 1000 रुपयांवर पोहोचला. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार की घसरण होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असेल.