प्रशिक्षण घेतले नन होण्याचे आणि बनली पॉर्नस्टार

yudi-pinida
नन (जोगीण) होण्याचे वयाच्या आठव्या वर्षी एका मुलीने प्रशिक्षण घेतले. पण तिने आपल्या या निर्णयाला अगदी उलट टर्न देत आता ती विख्यात पॉर्नस्टार झाली आहे. या मुलीचे नाव युडी पिनिडा असे असून आता ट्रेनी ननने आपण पॉर्नस्टार असल्याचे जाहीर केले आहे. युडी पिनिडा ही कोलंबियाची असून ती चर्चमध्ये अगदी कमी वयापासून जात असे. तिने नन होण्याचा निर्णयही घेतला होता. त्याचबरोबर तिने त्यासाठी आठ वर्षे प्रशिक्षणही घेतले. पण आता तिने आपला हा निर्णय पूर्णपणे बदलत ती एक पॉर्नस्टार झाली आहे. तिची कोलंबियात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच तिचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा आमच्या शाळेत नन्स येत असत. मी त्यांना पाहून आपणही त्यांच्यासारखेच व्हावे असे मला वाटत होते म्हणून मी नन होण्याचे प्रशिक्षण घेतले. तिचे आठ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाले तेव्हा तिच्या धर्मगुरुंनी तू नन म्हणून कुठे काम मिळते का? हे पाहा असे तिला सुचवले. नन म्हणून आपल्याला कुठे काम मिळेल का? याचा शोध युडी घेत होती तेव्हाच जुआन बुस्टोशी तिची भेट झाली. अॅडल्ट वेबकॅम मॉडेल्सना जुआन बुस्टो हा काम मिळवून देतो. युडीने त्याच्याशी भेट झाल्यानंतर पॉर्नस्टार होण्याचा निर्णय घेतला.

पॉर्नस्टार होण्याचा निर्णय मी घेतल्यावर मला थोडे वाईट वाटले. पण माझ्या निर्णयाचा मला पश्चाताप होत नाही. आताही मी चर्चमध्ये आवर्जून जाते, शुक्रवारी होणारी प्रार्थना कधीही चुकवत नाही असेही युडीने सांगितले. माझे काम चांगले आहे मला त्याची लाज वाटत नाही तसेच ते वाईट आहे असेही वाटत नाही असेही युडीने म्हटले आहे.

Leave a Comment