रविंद्र मराठे पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी

bank-of-maharashtra
पुणे – पुन्हा एकदा संचालकपदाचे अधिकार बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रविंद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांना बहाल करण्यात आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालक मंडळाने हा निर्णय २ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत घेतला.

मराठे यांच्यावर पुण्यातील बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे २९ जूनला बैठकीत बँकेच्या संचालक मंडळाने मराठे आणि गुप्ता यांना जबाबदाऱ्यांपासून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. पण मराठे यांचा डी. एस. कुलकर्णी कर्ज प्रकरणात संबंध नसल्याचा निर्णय आर्थिक पुणे शाखेच्या विशेष न्यायालयाने दिला. या कारणाने मंडळाने पुन्हा त्यांचे अधिकार परत बहाल केले आहे.

Leave a Comment