डाऊनलोड स्पीड फोरजीमध्ये एअरटेलच अव्वल

airtel
नवी दिल्ली – डाऊनलोड स्पीड फोरजीमध्ये भारती एअरटेलने अव्वल स्थान पटकावले असून आयडिया सेल्युलरने फोरजी अपलोडमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये मोबाइल सेवांचे विश्लेषण करणाऱ्या ओपन सिग्नलने केलेल्या सर्वेसंदर्भातला हा अहवाल असून एअरटेलने ज्यामध्ये डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी मारली आहे.

फोरजी सेवेच्या अॅव्हेलिबिलिटीच्या बाबत जिओ हे या रिलायन्सच्या स्वस्तात मस्त आणि लोकप्रिय झालेल्या कंपनीने ९६.७ टक्के एवढा स्कोअर नोंदवला आहे. ओपन सिग्नलच्या अहवालानुसार एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन यांच्यात मोबाइल व्हिडीओचा अनुभव कसा आहे हे तपासण्यासाठी तुलना करण्यात आली. ज्यामध्ये डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेल टॉपला आहे हे समोर आले आहे.

Leave a Comment