मुलीचे नाव केएफसीच्या मालकाच्या नावावरून ठेवले, मिळाली ८ लाखांची भेट

KFC
आपल्या नवजात अपत्याचे नाव काय ठेवावे याचा विचार पालक खूप आधीपासूनच करतात. पालकांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याच्यासाठी नाव शोधून ठेवलेले असते. पण कंपनीच्या मालकाच्या नावावरून एखाद्या पालकांना त्याच्या होणाऱ्या बाळाचे नाव हे ठेवायला सांगितले तर..?

‘केएफसी’या जगातील सर्वात मोठ्या फूडचेन पैकी एक असलेल्या ब्रँडने काही दिवसांपूर्वी एका स्पर्धेच आयोजन केले होते. अमेरिकेपुरतीच ही स्पर्धा मर्यादीत होती. जवळपास आठ लाखांहून अधिकचे पारितोषिक विजेत्यांसाठी ठेवण्यात आले होते. पण या ब्रँडने स्पर्धेसाठी दोन अटी ठेवल्या होता. पहिली अट म्हणजे होणाऱ्या बाळाचे नाव हे पालकाने ‘हारलँड’ असे ठेवलं पाहिजे आणि दुसरी अट हे बाळ ९ सप्टेंबर रोजी जन्मले पाहिजे.

केएफसीचे ‘हारलँड’ हे जनक असून केंटुकी फ्राईड चिकनची म्हणजेच केएफसीची हारलँड सँडर्सने स्थापना केली. त्यांचा ९ सप्टेंबर हा जन्मदिवस असल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ पालकांनी होणाऱ्या बाळाचे नाव हारलँड ठेवावे या कल्पनेतून ब्रँडने स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेची विजेती ‘हारलँड रोझ’ नावची छोटी चिमुकली ठरली आहे. ९ सप्टेंबरला तिचादेखील जन्म झाला. तिचे पालक अॅना आणि डेकर या दोघांनीही तिचे नाव ‘हारलँड रोझ’ ठेवले. स्पर्धेच्या दोन्ही अटी पूर्ण झाल्या असल्याने ती केएफसी स्पर्धेची विजेती ठरली आहे. ब्रँडने तिला जवळपास आठ लाखांहून अधिकची रक्कम आणि केएफसी चिकनच्या पाककृतीचे गुपित असलेले काही हर्ब तिला देऊ केले आहेत.

Leave a Comment