विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ

gas
नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहेत. ही अल्प घसरण असली तरी यातून जनतेला थोडाफार दिलासा मिळत आहे. पण आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराला दरवाढीचा फटका बसणार आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत नोव्हेंबर महिन्यात ६० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही ५९ रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर अनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात २.९४ पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग सातवी वाढ आहे.

दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ८८० रुपये असेल. विशेष म्हणजे सरकारने अनुदानित सिलिंडरवर देण्यात येणारी सूट नोव्हेंबर २०१८ मध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांच्या खात्यात ४३३.६६ रुपये जमा होतील. तर ऑक्टोबर २०१८ मध्ये ही रक्कम ३७६.८० पैसे एवढी होती. इंडियन ऑइलने सप्टेंबरमध्ये निवेदन प्रसिद्ध केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्यामुळे आणि विदेशी मुद्रा विनिमय दरातील चढ-उतार हे सिलिंडरच्या दर वाढीस कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment