रेल्वेच्या १५ प्रिमिअम गाड्यांच्या फ्लेक्सी भाड्यात कपात

indian-railway
नवी दिल्ली – केंद्र सरकारने आरामदायी आणि जलदगती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १५ प्रिमिअम रेल्वे गाड्यांच्या फ्लेक्सी-भाड्यात कपात केली असल्यामुळे त्या गाड्यांच्या तिकीटांचे दर कमी झाले आहेत. पण ३२ गाड्यांना हे दर यात्रेचा हंगाम नसताना लागू राहतील.


सरकारने हा निर्णय प्रवाशांना दिवाळीचे बक्षिस म्हणून घेतला असल्याचे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. एकूण तिकिटांच्या किमतीवर लावण्यात येणारे १.५ टक्के फ्लेक्सी भाडे कमी करुन १.४ टक्के करण्यात आले आहे. कपात झाल्यामुळे तिकट दर कमी होणार आहेत. केंद्र सरकारने सप्टेंबर २०१६मध्ये रेल्वे तिकिटांवर फ्लेक्सी-भाडे लावणे सुरू केले होते. रेल्वेमध्ये विविध सुविधा पुरवण्यासाठी हे भाडे प्रवाशांवर आकारण्यात येत होते. फ्लेक्सी भाडे ४४ राजधानी, ५२ दुरंतो आणि ४६ शताब्दी गाड्यांमध्ये लागू करण्यात आले होते. या गाड्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण झाल्यास, फ्लेक्सी-भाडे पूर्णतया काढले जाणार आहेत, असेही रेल्वे मंत्र्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment