चीनी ड्रॅगनला भात खाऊ घालणार भारत

rice
तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या भारताने आता चीन मध्ये मोठ्या प्रमाणावर तांदूळ निर्यात करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे बासमती शिवाय अन्य जातीचा हा तांदूळ असून चीन सुमारे २ अब्ज डॉलर्सचा तांदूळ आयात बाजार भारतासाठी खुला करणार असल्याचे सांगितले जात आहे.

जून २०१८ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर गेले होते तेव्हाच या संदर्भातील बोलणी चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग याचबरोबर झाली होती आणि त्या संदर्भात करारही करण्यात आला होता. हा करार बिगर बासमती तांदळाबद्दल होता असे समजते. या नंतर चीनी अधिकारी भारत भेटीवर आले आणि त्यांनी येथील तांदूळ गिरण्यांचे निरीक्षण करून २४ तांदूळ गिरण्यांना पसंती दर्शविली होती.चायना चेम्बर ऑफ कॉमर्स आणि भारतीय दूतावास यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला चीन मधील ४४ आयातदार उपस्थित होते.

Leave a Comment