मुंबई : आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्ट पुन्हा एकदा बंपर सेल घेऊन येत असून कंपनीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बिग फेस्टिव्ह सेल आणला आहे. १ ते ५ नोव्हेंबरपर्यंत हा फेस्टिव्ह सेल असणार आहे.
फ्लिपकार्टवर १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान फेस्टिव्ह धमाका
ग्राहकांना या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर भरघोस सूट मिळणार आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टकडून स्मार्टफोन ते घरगुती वस्तूंपर्यंत ८० टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. तसेच अनेक वस्तूंवर एक्स्चेंज ऑफरसोबत अॅक्सिडेंटल वॉरंटीची सुविधा देण्यात येणार आहे. या शॉपिंग वेबसाईट्सवर मोबाईलसोबतच मोबाईल अॅक्सेसरीज, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, फॅशन अॅक्सेसरीज यासारख्या अनेक उत्पादनांवरही आजपासून भरघोस सूट मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही खूशखबर आहे.
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर या दोन्ही शॉपिंग साईटवर काही दिवसांपूर्वीच सेल सुरु होता. अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टीव्हल म्हणून तर फ्लिपकार्टवर फेस्टीव्ह धमाका हा सेल सुरु होता. फ्लिपकार्टच्या फेस्टीव्ह धमाका सेलमध्ये कपड्यांवर ९० टक्के तर इलेक्ट्रीक वस्तूंवर ८० टक्के सूट देण्यात आली होती.