ब्रिटनमधील एका धनकुबेराने ‘त्या’ एका नंबर प्लेटसाठी मोजले तब्बल १३२ कोटी रुपये

expensive
आपल्या प्रतिष्ठेसाठी उच्चभ्रू लोक पैसा पाण्यासारखा ओततात हे आपण ऐकले असेल. पण आता त्याचीच प्रचिती एका नंबर प्लेटच्या किमतीवरून आली आहे. जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट ब्रिटनमध्ये विकण्यात आली आहे. त्या एका नंबर प्लेटसाठी एका धनकुबेराने तब्बल १३२ कोटी रुपये मोजले आहेत. F1 असा क्रमांक या नंबर प्लेटवर आहे. साऱ्या जगात हा क्रमांक अतिशय लोकप्रिय आहे. सोबतच, हा नंबर मर्सेडीज, मॅकलॅरेन SLR, रेंज रोव्हर आणि बुगाटीसह अनेक कंपन्या बनवतात. भारतात या नंबरच्या किमतीची मिळणाऱ्या मर्सेडीझ ए-क्लास कारच्या (२३.३१लाख रुपये) किमतीशी तुलना केल्यास, त्या एका नंबरच्या तुलनेत ४०० मर्सेडीझ विकत घेता येतील.

ब्रिटनचे अफजल खान यांनी नंबर प्लेट विकण्यासाठी एक जाहिरात दिली होती. कस्टमाइज्ड कार डिझाइन करणारी कंपनी ‘खान डिझाइन’चे ते मालक आहेत. हा नंबर सध्या बुगाटी वेरॉनमध्ये लागलेला आहे. हा नंबर त्यांनी गतवर्षी १०.५२ कोटी रुपयांत विकत घेतला होता. ११० कोटी रुपयांत या नंबर प्लेटची विक्री होत असली तरीही व्हॅट आणि ट्रान्सफर चार्जेससह त्याची किंमत १३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. F1 नंतर दुबईचे बलविंदर सहानी यांच्या कारचे नंबर D-5 जगातील दुसरे सर्वात महागडे नंबर आहे. त्याची किंमत ६७ कोटींच्या घरात आहे.

कस्टममाइज्ड नंबर प्लेटचा नियम भारतात नाही. भारतात फक्त RTO कडून स्पेशल नंबरची प्लेट खरेदी केली जाऊ शकते. टू-व्हीलरसाठी स्पेशल नंबर हवा असेल तर ५ हजार ते ५० हजारांपर्यंत मोजावे लागतात. फोर व्हीलरसाठी १५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आकारले जातात. त्यातही एका ठराविक नंबरसाठी एकापेक्षा अधिक ग्राहक इच्छुक असतील तर त्यासाठी लिलाव केला जातो. जो अधिक बोली लावणार त्यालाच विक्री केली जाते.