पुण्याच्या व्यापाऱ्याला ८० कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी अटक

GST
पुणे : ८० कोटींचा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी बुडवल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापाराला मुंबईतून अटक करण्यात आली असून ही कारवाई डिरेक्टर जनरल आॅफ जीएसटी इंटेलिन्सने केली आहे. पुण्याच्या मोदसिंग सोधा या व्यापाऱ्याने ८० कोटींचा जीएसटी बुडवला.

मोदसिंह सोधाला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मोदसिंह सोधाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोदसिंग सोधा हा १० बनावट कंपन्या चालवत होता. या कंपन्यांच्या माध्यमातून त्याने ४१५ कोटींचा गैरव्यवहार केला. हा काळा पैशाचा भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Leave a Comment