आमदार प्रणिती शिंदे म्हणतात; सोलापूरचा खासदार ‘बेवडा’

praniti-shinde
सोलापूर – सोलापुरातील विद्यमान भाजप मंत्री आणि खासदारांवर आमदार प्रणिती शिंदे यांनी निशाणा साधला असून त्यांची जीभ आवेशपूर्ण भाषण करण्याच्या नादात घसरली. सोलापूरातील खासदाराचा उल्लेख त्यांनी चक्क ‘बेवडा खासदार’, असा केल्यामुळे सोलापूरच्या राजकीय गोटात चर्चेला उधाण आले आहे.

नेत्यांच्या भाषणाची धार निवडणुका जवळ येत असताना अधिक प्रभावी होत असल्याचे दिसून येत आहे. आवेशपूर्ण भाषण करण्याच्या नादात शब्दमर्यादा न पाळता शाब्दिक हल्ले चढवले जात असल्याचा प्रत्यय नुकताच सोलापूरकरांना आला. आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील मौलाली चौकात नगरोत्थान योजनेतून ७ कोटींचे रस्ते आणि ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्या यावेळी बोलत होत्या. सोलापूरसाठी दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार यांनी दमडीचाही निधी आणला नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a Comment