सातव्या वेतन आयोगाव्यतिरिक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनामध्ये वाढ करणार मोदी सरकार !

combo
जयपूर – मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी निवृत्ती वेतन धारकांना मोठी भेट देण्याच्या तयारीत असून मोदी सरकार सातव्या वेतन आयोगाव्यतिरिक्त किमान वेतनामध्ये वाढ करणार आहे. त्यानुसार सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन २१ हजार रुपये करण्याचे निश्चित केले आहे.

सध्या १८ हजार रुपये किमान वेतन केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. पगारात ८ हजार रुपयाने वाढ करावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून ते करत आहेत. त्यांची मागणी सरकारने मान्य केल्यास त्यांचे किमान वेतन २६ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने २१ हजार किमान वेतनदर निश्चित केले आहे.

या वेतन वृध्दीची भेट केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधीच मोदी सरकार याबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे, असे म्हटले जात आहे.

Leave a Comment