आफ्रिकेतील खडकाळ भागात सापडले २० कोटी वर्षांपूर्वीच्या अद्भूत प्राण्यांचे अवशेष

part
२० कोटी वर्षांपूर्वीचे अवशेष दक्षिण आफ्रिकेत सापडले असून हे प्राणी २० कोटी वर्षांपुर्वीचे असल्याने तुम्ही-आम्ही कधीच पाहिलेले नाहीत. हे अवशेष दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडले असून ते मगर आणि सिंह या दोन्ही प्राण्यांची छाप असणारा हा प्राणी असल्याचे समोर आले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

संशोधकांना हे अवशेष आफ्रिकेतील खडकाळ भागात अतिशय अवघड अशी चढाई केल्यावर काही खडकांवर सापडले आहेत. याठिकाणी काही अवशेष सापडण्याची शक्यता असल्याचे आम्हाला लक्षात आल्यानंतर आम्ही खोदाई सुरु केली. आम्हाला त्यावेळी २००५ मध्ये अचानक याठिकाणी काही हाडे मिळाली. प्रयोगशाळेत नेऊन या हाडांचे परिक्षण करण्यात आले. त्यावेळी तो भाग त्या प्राण्याचा पार्श्वभाग असल्याचे लक्षात आले. कोणीच कधी अशाप्रकारचा प्राणी पाहिला नसल्याचे या संशोधनातून आमच्या लक्षात आले असे अमेरिकेतील एका संशोधकाने सांगितले. त्यावेळी हा मांसभक्षण करणारा आणि सर्व प्राण्यांमध्ये प्रबळ असणारा प्राणी होता. हा प्राणी जगात सगळ्याठिकाणी असल्याची नोंद असली तरीही दक्षिण आफ्रिकेत मात्र त्याची नोंद नाही.

पुरातत्व विभागातील संशोधकांना मागच्या काही वर्षात विविध प्रकारचे अवशेष सापडत असून ही संशोधनाच्यादृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. याबरोबरच हे डायनॉसॉरशी निगडीत अवशेष सापडण्यामध्ये दक्षिण आफ्रिका सध्या सर्वात आघाडीवर असल्याचेही बोलले जात आहे. आता सापडलेल्या अवशेषांचा प्राणी नेमका कसा होता याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळाली नसून संशोधनानंतर याबाबतच्या गोष्टी स्पष्ट होतील असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment