सुरतमधील डायमंड किंगकडून कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ६०० कार गिफ्ट

diamond
सुरत- अवघ्या काही आठवड्याभराच्या अंतरावर येऊन दिवाळीचा सण ठेपला असून बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलू लागल्या आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना गुजरातमधील एका व्यापाऱ्याने दिवाळीनिमित्त बंपर बोनस दिला आहे. सावजीभाई ढोलकिया या हिरे व्यापाऱ्याने आपल्या तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना भेट म्हणून मारूती कंपनीच्या कार बोनस म्हणून दिल्या आहेत.

डायमंड किंग म्हणून सावजीभाई ढोलकिया हे ओळखले जातात. अमरेली जिल्ह्यातील डुढला हे त्यांचे मूळ गाव आहे. १९७७मध्ये डोलकिया सुरतला आले. त्यावेळी त्यांच्या खिशात अवघे बारा रूपये होते. त्यांनी त्यानंतर आपल्या कष्टाने आपला हिरे विक्रीचा व्यवसाय विस्तारला आणि या उद्योगाची उलाढाल ६ हजार कोटी रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

कर्मचाऱ्यांना या गाड्या एका खास समारंभात भेट देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांचे कुटूंब त्यावेळी आनंदात न्हाऊन निघाले. कर्मचाऱ्यांना यापूर्वीही फ्लॅट भेट देण्यात आले होते. तसेच २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ३ कोटी रूपयांच्या मर्सिडीज बेन्झ गाड्या भेट म्हणून दिल्या होत्या. ढोलकिया यांच्या दिलदार वृत्तीचे नेहमी कौतुक केले जाते. मंदी असो वा तेजी ढोलकिया कर्मचाऱ्यांना या प्रकारच्या भेटी देत आले आहेत.

Leave a Comment