दिवाळीनंतर पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळणार

water
पुणे : संपूर्ण पुणे शहराला दिवाळीनंतर केवळ एकच वेळ पाणी पुरवठा होणार असून पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी ही माहिती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली. आतापर्यंत जलसंपदा विभाग खडकवासला धरण समुहातून पुणे शहरासाठी दररोज १३५० दशलक्ष लीटर पाणी देत होते. पण आता जलसंपदा विभागाने दररोज ११५० दशलक्ष लीटरच पाणी देण्याचे ठरवले आहे.

हा निर्णय गेल्या आठवड्यात कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. जलसंपदा विभागाने पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, हवेली आणि बारामती या दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्यासाठी पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी पुरवठ्याचे पुणे महापालिकेला नव्याने नियोजन करावे लागणार आहे‌. नियमांप्रमाणे जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेला ११५० दशलक्ष लीटर पाणी देणे अपेक्षित आहे. पण पालिका १६०० दशलक्ष लीटर पाणी दररोज उचलत होती.

ती मर्यादा जलसंपदाने आता १३५० दशलक्ष लीटर केली आहे. पण त्यामध्ये दिवाळीनंतर आणखी कपात करुन ती ११५० दशलक्ष लीटर करण्यात येणार असल्यामुळे आतापर्यंत पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात दोन वेळा होणारा पाणीपुरवठा यापुढे एकच वेळ करावा लागणार आहे.

Leave a Comment