दिवाळीच्या आधीच जिओने आणली धमाकेदार ऑफर

Jio
मुंबई : दिवाळीच्या आधीच टेलीकॉम ऑपरेटर कंपनी जिओने एक धमाकेदार प्लान लॉन्च केला असून या नव्या प्लानचे दिवाळी जिओ ऑफर असे नाव आहे. १०० टक्के कॅशबॅक या प्लानमध्ये मिळणार आहे. या प्लानचा लाभ ग्राहकांना १८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान घेता येणार आहे. सगळ्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.

१६९९ रुपये एवढी जिओच्या या प्लानची किंमत आहे. अनलिमिटेड कॉलिंग या प्लानमध्ये मिळणार आहे. याशिवाय रोज १०० एसएमएस मिळणार आहे. त्याचबरोबर जिओच्या या प्लानची मुदत एक वर्षासाठी असणार आहे. जिओ दिवाळी प्लानमध्ये ग्राहकांना ५४७.५ जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यानंतर ६४ केबीपीएसची स्पीड मिळणार आहे. जिओ दिवाळी कॅशबॅक ऑफरमध्ये जर तुम्ही १८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान १६९९ चे रिचार्ज केले तर तुम्हाला १०० टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे. ही कॅशबॅक तुम्हाला कूपनच्या रुपात मिळणार आहे. एकूण ३ कूपनमध्ये ही ऑफर मिळणार आहे. एका कूपनची किंमत ५०० रुपये आहे. याशिवाय २०० रुपयाच्या कूपनचा उपयोग ग्राहक रिलायंस डिजिटल एक्सप्रेस मिनी स्टोर्समध्ये करु शकता. यासाठी कमीतकमी ५००० रुपयांची खेरदी करावी लागेल.

Leave a Comment