मुंबई : आयडिया आणि वोडाफोनचे विलिनीकरण झाल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी वेगवेगळे प्लान लॉन्च करत आहे. कंपनीने आता पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. ग्राहकांना या ऑफरमध्ये पोस्टपेड मासिक बिलावर ५० टक्के सूट मिळणार आहे. कंपनीने याआधी प्रिपेड ग्राहकांसाठीही ऑफर आणल्या होत्या.
वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना मिळणार ५० टक्के डिस्काऊंट
वोडाफोन-आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवर डिस्काऊंट मिळणार आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना वर्षाला जास्तीत जास्त २४०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. एका वर्षाचा २४०० म्हणजेच महिन्याला २०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. बिल पेमेंट माय वोडाफोन अॅप किंवा माय आयडिया अॅपच्या माध्यमातून करावे लागणार आहे.
तुमच्याकडे कॅशबॅक ऑफरसाठी ३९९ रुपयांचा वोडाफोन रेड प्लान किंवा आयडियाचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान असणे आवश्यक आहे. ग्राहकांना ३९९ रुपयांच्या या प्लानमध्ये २०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. पण २९९ रुपयांच्या प्लानसाठी ही ऑफर मिळणार नाही.