पुणे शहरात देशातील पहिला चमत्कार ; गर्भाशय प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म,

birth
पुणे – पुण्यात भारतातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणानंतर गर्भवती असलेल्या महिलेची प्रसूती झाली आहे. एका गोंडस मुलीला या महिलेने जन्म दिला आहे. गर्भाशय प्रत्यारोपणानंतर जन्मलेले हे देशातील पहिले बाळ ठरले आहे. या मुलीने पुण्यातील ‘गॅलॅक्सी केअर रुग्णालयामध्ये जन्म घेतला आहे. भारतीय वैद्यकीय क्षेत्रासाठी ही घटना मोलाची मानली जात आहे.

आतापर्यंत प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून जगभरात ११ बाळांचा जन्म झाला आहे. पुण्यात जन्मलेले हे बाळ १२ वे आहे. हे बाळ आज रात्री १२ वाजून १२ मिनिटांनी जन्माला आले. या बाळाचे वजन १ किलो ४५० ग्रॅम एवढे आहे. सध्या बाळाची आणि आईची प्रकृती उत्तम असल्याचे गॅलॅक्सी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. सोलापूर येथील एका महिलेला तिच्या आईने मे २०१७ मध्ये गर्भाशय दान केले होते. गर्भाशय प्रत्यारोपणाची ही देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया होती. त्यानंतर लगेचच बडोदा येथील मीनाक्षी वालंद या महिलेवर गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Leave a Comment