या ४० वर्षीय महिलेने १८ वर्षात दिला तब्बल ४४ बाळांना जन्म!

marium
युगांडातील मुकोनो जिल्ह्यात राहणाऱ्या ४० वर्षीय मरियम नाबटेंजी या महिलेला आफ्रिकेतील मोस्ट फर्टाइल वुमन म्हटले जाते. कारण गेल्या १८ वर्षात मरियमने तब्बल ४४ मुला-मुलींना जन्म दिला आहे.
marium2
गावातील लोक मरियमला नालोंगो मुजाला असे देखील म्हणतात. याचा अर्थ जुळी आई जी चार बाळांना जन्म देऊ शकते. ती ४० वर्षात १८ वेळा गर्भवती राहिली. दरम्यान सहा वेळा जुळ्या मुलांना मरियमने जन्म दिला. तिला चारदा तीन-तीन बाळे झालीत आणि तीनदा तिने चार-चार बाळांना जन्म दिला.
marium1
पण मरियमचे ४४ पैकी केवळ ३८ मुले-मुली जिवंत आहेत. एकाच परिवारात सर्वजण राहतात. मरियमचा पती रोजगारासाठी परिवारापासून दूर राहतो आणि कधी कधी घरी येतो. अशात परिवाराचे पोट भरण्याचे काम मरियम एकटीच करते. जेव्हा १२ वर्षांची मरियम होती तेव्हा तिचे लग्न २८ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत लावण्यात आले होते.
marium3
युगांडातील ‘डेली मॉनिटर’ या वृत्तपत्राशी बोलताना मरियमने सांगितले की, मी जेव्हा १३ वर्षांची होती तेव्हा पहिल्यांदा गर्भवती झाले होते. मी त्यावेळी जुळ्या बाळांना जन्म दिला. एका वर्षानंतर मी तीन बाळांना जन्म दिला आणि त्यानंतर पुन्हा एका वर्षाने मी चार बाळांना जन्म दिला. लोकांनी ही फार आश्चर्याची बाब वाटते, पण हे माझ्यासाठी आश्चर्या नाही. कारण माझ्या वडिलांना ४५ मुले होती.

मरियम २३ वर्षांची होती तेव्हा तिची २५ मुले होती. ती त्यानंतर रुग्णालयात गेली. तेव्हा माहिती पडले की, तिचे एग्स काऊंट जास्त आहे. मरियमचा हा बाळांना जन्म देण्याचा सिलसिला ४४ व्या बाळानंतर २०१६ मध्ये थांबला. आता तिचा पती कधी कधीच घरी येतो. मरियम आता परिवाराचे पोट भरण्यासाठी मजूरी, जडीबूटी आणि महिलांचे मेकअप करुन देण्याची कामे करते.

Leave a Comment