नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने आणली आहे. आपल्या ग्राहकांसाठी बीएसएनएलने STV-78 प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे.
७८ रुपयांत बीएसएनएलच्या ग्राहकांना मिळणार अनलिमिटेड डेटा आणि कॉल
७८ रुपये एवढी बीएसएनएलच्या या नवीन प्लॅनची किंमत आहे. हा प्लॅन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दुर्गा पूजा, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त आणला आहे. ७८ रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेटा आणि व्हिडीओ कॉल्स करता येणार आहे. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना STV COMBO78 असा मेसेज १२३ या नंबरवर पाठवावा लागणार आहे.
याचबरोबर, ग्राहकांना यामध्ये रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी १० दिवसांची असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. म्हणजेच कंपनीकडून एकूण २० जीबी डेटा दिला जाणार आहे. १५ ऑक्टोबरपासून हा प्लॅन लागू करण्यात आला असून देशभरातील ग्राहकांना ३ जी सुविधेअंतर्गत याचा लाभ घेता येणार आहे.