मुकबधिर महिलेवर भारतीय सैन्यातील ४ जवानांचा लैंगिक अत्याचार

rape
पुणे – मुकबधिर महिलेवर भारतीय सैन्यातील ४ जवानांनी पुणे शहरातील खडकी परिसरात असलेल्या लष्कराच्या रुग्णालयात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकी पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिला मुकबधिर असून लष्कराच्या रुग्णालयात कार्यरत आहे. रात्रपाळीत काम करत असताना ४ वर्षापूर्वी एका कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यासंदर्भातील तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असता त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. यानंतर इतर दोघांनीही ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिलेने इंदूर येथील एका एनजीओशी संपर्क साधल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित महिलने याविरोधात खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी यावरून ४ आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.

Leave a Comment