३० वर्षांपासून धूळ खात पडलेल्या या भंगार कारची किंमत कोटीच्या घरात

porsche2
टेक्सस – खूप वर्षांपासून गंज लागलेल्या कारकडे बघून येथील डलाश शहरातील लोक भंगार वस्तू समजत राहिले. परंतु ही कार जेव्हा कारचा मालक कंपनीकडे घेऊन गेला. या कारची किंमत कंपनीने सांगितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. १९५८ मध्ये ही कार बनवण्यात आली होती परंतु खरेदी करणाऱ्या व्यक्तीने काही कारणामुळे १९८३ पासून कार चालवणे बंद केले. परंतु या कारची किंमत कंपनीने कोटीच्या घरात सांगितली.
porsche3
पोर्शची १६०० सुपर स्पीडस्टर ही कार आहे. त्याकाळातील ही सर्वात फास्ट कार होती. ही कार ज्या व्यक्तीने सेकंड हॅन्ड खरेदी केली होती, तो कारला पुन्हा तयार करून चालवणार होता परंतु काही कारणामुळे हे शक्य झाले नाही आणि कार तशीच पडून राहिली. गाडीचा मालक या कारला भंगार समजून कंपनीकडे विकण्यासाठी घेऊन गेला आणि कंपनीच्या गोष्टी ऐकून तो आश्चर्यचकित झाला. त्याला सांगण्यात आले की, ही पोर्शची सर्वात उत्तम स्पोर्ट्स कार असून एखाद्या व्हिंटेज कारपेक्षा कमी नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये कार विकली तरी तिचे जवळपास सव्वा लाख पाउंड म्हणजेच १ कोटी २० लाख मिळतील. हे ऐकून कारचा मालक आवक् झाला कारण वर्तमानात मिळणाऱ्या पोर्शच्या स्पोर्ट्स कारपेक्षा ही किंमत जास्त होती. या कराची एवढी किंमत कशी काय असे त्याने कंपनीला विचारले.
porsche1
कंपनीने सांगितले की, हे अत्यंत रेअर मॉडेल आहे आणि कंपनीला हे परत पाहिजे. आर एम सोथ्सबे कंपनीने ही कार खरेदी करून पुन्हा रीस्टोर करण्याचा निश्चय केला. त्यानंतर या कारचा पोर्शच्या वार्षिक सेलिब्रेशनमध्ये लिलाव केला जाईल. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले की, कोटींमध्ये विकल्या गेलेल्या या भंगार कारची अवस्था अत्यंत वाईट आहे. यामध्ये इंजिन व्यक्तिरिक्त काहीही शिल्लक नाही. बॉडी पूर्णपणे झिजून गेली आहे. कंपनी ही कार पुन्हा बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करणार आहे. २७ ऑक्टोबरला जॉर्जिया येथे होणाऱ्या पोर्शच्या ७०व्या वार्षिक कार्यक्रमात कारचा लिलाव केला जाईल.