पत्नीला बॉयफ्रेण्डसोबत गुगल मॅप्सवर पतीने पकडले रंगेहाथ !

google1
मुंबई : हल्ली अनेक जण रस्ता शोधण्यासाठी ‘गुगल मॅप्स’ची मदत घेतात, पण पेरु देशातील एका व्यक्तीच्या आयुष्याला दिशा शोधताना नवीन ‘दिशा’ मिळाली. गुगल मॅप्सवर संबंधित व्यक्तीने त्याच्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडले.

पती पेरु देशातील इच्छित ब्रिजवर पोहचण्यासाठी गुगल मॅप्सच्या मदतीने जवळचा रस्ता शोधत होता. पण त्याला ‘स्ट्रीट व्ह्यू’ फोटोग्राफ्स बघताना ओळखीची आकृती सापडली. पांढरा टीशर्ट आणि जीन्स घातलेली ही स्त्री दुसरी-तिसरी कोणी नसून आपली पत्नी असल्याचे त्याने ओळखले. एका बेंचवर बसलेल्या पत्नीच्या मांडीवर तिच्या बॉयफ्रेण्डने डोके ठेवले होते. पतीचा हे पाहून तिळपापड झाला. त्याने तातडीने पत्नीला याचा जाब विचारला आणि तिनेही आपले अफेअर असल्याचे कबूल केल्यानंतर घटस्फोटासाठी पतीने अर्ज केला. जगभरातील कार, बाईक यासह अनेक लोकेशन्सचे गूगल स्ट्रीट व्ह्यू वेहिकलने ३६० अंशात चित्रण केल्यामुळे जोडीदाराला फसवून तुम्ही तिसऱ्याच व्यक्तीसोबत असल्याचे कदाचित गूगलच्या नजरेतून सुटले नसेल.

Leave a Comment