नवी दिल्ली – संवाद साधण्यासाठी फेसबुक हे प्रभावी माध्यम असल्याने त्याचा अनेक जण मोठ्याप्रमाणावर वापर करत असतात. पण मर्यादीत संख्येतच मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे आतापर्यंत शक्य होते. नेहमीच युजर्ससाठी नवीनवीन फिचर्स फेसबुक आणत असते. यावेळी फेसबुकच्या ग्रुप चॅटमध्ये एकाच वेळी २५० जणांना अॅड करणे शक्य होणार आहे.
फेसबुक ग्रुप चॅटमध्ये आता २५० जणांना करता येणार अॅड
एकाच वेळी २५० जणांसोबत आता फेसबुकच्या या नव्या फिचरमुळे संवाद साधता येणार आहे. याबाबतचे एक वृत्त टेकक्रंचने दिले आहे. फेसबुकवर ग्रुप चॅट कोणी सुरू केल्यानंतर तुम्हाला त्याचे निमंत्रण देणार एक नोटीफिकेशन येईल. तुमची परवानगी असेल किंवा तुम्हाला चॅट करायची इच्छा असल्यास तुम्ही ते निमंत्रण स्विकारू शकता. तुम्ही त्यानंतर ग्रुप चॅटमध्ये सहभागी व्हाल. यामध्ये ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. यामध्ये एकाच वेळी ५० जण सहभागी होऊ शकतात.
ग्रुप चॅटमध्ये मेसेज रिअॅक्शनचे नोटीफिकेशन, नोटीफिकेशन ऑन ऑफ, चॅट दरम्यान मेन्शन करणाऱ्या सर्व गोष्टी असणार आहे. पण ग्रुप किती जणांचा असावा आणि ग्रुप कधी बंद करावा हे अधिकार ग्रुप अॅडमिनकडे असणार आहेत. याआधी फेसबुकच्या ग्रुपमध्ये केवळ १५० जणांना अॅड करणे शक्य होते.