लखनऊ – मागील तब्बल तीन पिढ्यांपासून बक्शी का तालाब परिसरातील एका मुस्लीम कुटुंबातर्फे ‘रामलीला’ सादर केली जात आहे. या कार्यक्रमाचे दरवर्षी नवरात्री दरम्यान धार्मिक व सामाजिक सलोख्याचा संदेश देत आयोजन केले जाते.
मागील तीन पिढ्यांपासून हे मुस्लीम कुटुंब सादर करत आहे ‘रामलीला’
कार्यक्रमाचे मोहम्मद सबीर खान हे दिग्दर्शक असून १९७२ पासून ते दरवर्षी ‘रामलीले’त सहभागी होत आहेत. सबीर म्हणाले की, १९७२पासून रामलीला सुरू आहे. यात हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजांचे लोक सहभागी होतात. ‘रामलीले’त मी १३ वर्षांचा असताना पहिल्यांदा काम केले. मी तेव्हापासून दरवर्षी यात सहभाग घेतो. दरवर्षी रामलीलेत सबीर, त्यांची दोन मुले आणि नातू उत्साहाने सादरीकरण करतात.
खान हिंदू आणि मुस्लिमांमधील एकोप्याविषयी बोलताना म्हणाले की, हिंदू आणि मुस्लीम अशी विभागणी परमेश्वराने केलेली नाही. आम्ही सगळे एक आहोत. सर्व हिंदू-मुस्लीम एकमेकांसाठी भावंडांसारखे आहेत. यासर्वांपलीकडे जाऊन सर्वांत आधी आपण सर्व मानव आहोत.