हॉनर सी ८ बजेट स्मार्टफोन लाँच

honor
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी हुवाईने त्यांचा सबब्रांड हॉनरचा नवा सी ८ हा बजेट स्मार्टफोन चीन मध्ये गुरुवारी सादर केला असून त्यासाठी ११ ते १५ ऑक्टोबर या काळात प्रीबुकिंग करता येणार आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेजसाठी ११८०० तर ६४ जीबी स्टोरेज साठी १५००० रुपये मोजावे लागणार आहेत. याचे बुकिंग व्हीमॉल वर करता येणार आहे.

या फोनला ६.२६ इंची एचदि, टीएफटी, आयपीएस डिस्प्ले दिला गेला आहे. फोनची मेमरी मायक्रो कार्डचा सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा असून १३ व २ एमपीचे रिअर ड्युअल कॅमेरे, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. ४ हजार एएमएचची नॉनरिमूव्हेबल बॅटरी आहे. हा फोन ऑआ ब्लू, मॅजीक नाईट, प्लॅटीनम गोल्ड आणि नेब्युला पर्पल रंगात मिळेल.

Leave a Comment