प्राचीन बनशंकरी मंदिर

banshankari
भारतात जवळजवळ प्रत्येक गावात किमान एकदरी देवी मंदिर आहे. सध्या नवरात्र सुरु आहे आणि त्यामुळे सर्व देवी मंदिरात भाविकांची एकाच गर्दी होते आहे. कर्नाटकातील बदामी पासून ५ किमी अंतरावर असलेले बनशंकरी मंदिर हे प्राचीन मंदिर १७ व्या शतकात बांधले गेलेले आहे. पूर्वी या भागात दाट जंगल होते. त्याला तिलाकारण्य म्हणत असत. या जंगलात हे मंदिर होते म्हणून त्याला बनशंकरी किंवा वनशंकरी असे नाव पडले.

हि देवी पार्वती म्हणजे दुर्गा आहे. असे सांगतात कि याच जागी देवीने दुर्गमयुर या राक्षसाचा वध केला होता. बदामी हि चालुक्य राजांची ऐतिहासिक राजधानी. बनशंकरी मंदिर या चालुक्य काळातील असून ती त्यांची कुलदेवी होती असेही मानतात. स्कंद पुराणात या मंदिराचे उल्लेख आहेत. मात्र सध्याचे मंदिर चालुक्य काळातील असून द्रविड शैलीत त्याचे बांधकाम केले गेले आहे. मंदिराजवळ हरिद्रा तीर्थ नावाचा सुंदर तलाव आहे.मंदिरात तीन दीपमाला आहेत.

बनशंकरीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून हि अष्टभुजा मूर्ती सिंहावर आरूढ आहे. तिने पायाखाली दैत्याला चिरडले आहे आणि तिच्या हातात त्रिशूल, कपालपात्र, वेद, खड्ग, घंटा आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव होतो.

Leave a Comment