उपासाला चालणारा साबुदाणा शाकाहारी का मांसाहारी?

sabudana
सध्या भारतभर नवरात्रीचे पर्व सुरु असून या काळात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात. उपवास म्हटले कि आपल्या नजरेसमोर अनेक पदार्थ फेर धरतात. त्यात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वाडे, साबुदाणा थालीपीठे, साबुदाणा पापड्या, साबुदाणा पीठाचे लाडू, चिवडा असे अनेक पदार्थ असतात. पण हा साबुदाणा कसा बनविला जातो याची माहिती बहुतेकांना नसते. हि माहिती वाचली तर साबुदाणा शाकाहारी कि मांसाहारी असा प्रश्न कुणालाही पडेल.

sabu
साबुदाणा हा सागो नावाच्या झाडाच्या कंदापासून बनविला जातो. हे कंद रताळ्याप्रमाणे असतात. तामिळनाडू येथे साबुदाणा बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. साबुदाणा वनस्पतीजन्य आहे हे खरे असले तरी साबुदाणा बनविण्याची कृती वेगळी आहे.

pond
हे कंद प्रथम जमिनीत खड्डे करून त्यात अनेक महिने भिजविले जातात. खड्यांजवळ दिवे लावलेले असतात. हे खड्डे उघड्यावर असतात आणि दिव्यामुळे तेथे अनेक प्रकारचे कितात, किडे येतात ते या पाण्यात पडतात. कंद कुजू लागले कि त्यात काहीवेळा पांढरया आळया होतात. या सर्वासकट हे कंद कधी पायाने तुडवून तर कधी कुसकरून रगडले जातात आणि त्या पिठापासून कानाकेसारखा गोळा तयार केला जातो. या गोळ्यापासून मशीनच्या मदतीने साबुदाण्याचे छोटे दाने तयार केले जातात आणि त्याला पॉलिश करून विक्रीसाठी पाठविले जातात. हाच साबुदाणा आपण उपवासाचा पदार्थ म्हणून आवडीने खातो.

Leave a Comment