एवढे पगार वाढीमुळे वेडे झाले आहेत एसटी कर्मचारी : रावते

diwakar-raote
औरंगाबाद : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले आहेत, की ते वेडे झाले असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यांनी आपण हे अधिकृतपणे बोलत असल्याची पुष्टीही जोडली. दिवाकर रावते यांनी हे अजब वक्तव्य औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना केले आहे.

औरंगाबादेत शहर बससेवा एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या वतीने चालवली जाणार आहे. शहर बससेवाही सध्याच्या पगारातच चालवली जाणार का, असा प्रश्न रावतेंना विचारण्यात आला. त्यावर- एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले आहेत, की ते वेडे झाले आहेत. मी हे अधिकृतपणे बोलत असल्याचे उत्तर दिवाकर रावतेंनी दिल्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो.

आपला तोटा भरुन काढण्यासाठी एसटी माल वाहतूक सुरु करणार असल्याची माहितीही रावतेंनी दिली. एसटीच्या कायद्यात तशी तरतूद असल्याने लवकरच रेल्वे प्रमाणे एसटीतून मालवाहतूक सुरु होणार आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी जून महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस अघोषित संप पुकारला होता. सरकारचे या संपामुळे प्रचंड नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. संपावेळी हिंसाचार करण्यात नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या सर्व कर्मचाऱ्यांवर सरकारने बडतर्फीची कारवाई केली होती.

Leave a Comment