ऑनलाईन पोर्न साईट पाहणाऱ्यांना येऊ शकतो खंडणीसाठी फोन

porn
मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन विविध साईट पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असून खंडणीसाठी तुम्हाला फोन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही जर फेसबुक, युट्यूब, डेटिंगसाईट्स, मॅट्रीमोनी अशा विविध साईट्सवर सर्फिंग करत असाल तर आताच सावध व्हा…कारण कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे.

जर इंटरनेटवर पोर्नोग्राफी तुम्ही पाहात असाल तर तुम्हाला ते अलगद त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्याकडून खंडणी वसूल करतात आणि ते तुम्हाला खंडणीसाठी धमक्याही देऊ शकतात. या खंडणीखोरांची गुन्हा करण्याची पद्धत अनोखी आहे. सोशल मीडियावरून ते तुमची माहिती चोरीछुपे मिळवतात आणि खंडणी वसूलीचा खेळ सुरू होतो. अशा गुन्हांची संख्या जगाच्या तुलनेत भारतात अधिक आहे.

केवळ माहिती मिळवण्याचे इंटरनेट आज साधन राहिले नाही, तर सोशल मीडियासोबतच मनोरंजनाचे साधन बनले आहे. त्यामुळेच इंटरनेटवरील पोर्नोग्राफीच्या आहारी गेलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पोर्न साईटच्या नावाखाली कुणी धमकावण्याचा अथावा खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करू शकता. असा फोन तुम्हाला आल्यास तात्काळ सायबर सेलची मदत घ्या आणि ऑनलाईन काहीही करताना जरा काळजीच घ्या.

Leave a Comment